You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दाम्पत्य जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दाम्पत्य जखमी

सावंतवाडी

भरधाव वेगाने येणाऱ्या कारची दुचाकीला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. हा अपघात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-वेत्ये परिसरात घडला. दरम्यान जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर अपघाताची माहिती सोनूर्ली येथील युवा कार्यकर्ते राज सोनुर्लेकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र धडक दिलेल्या कारने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे ती कार नेमकी कोणाची हे कळू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरील दाम्पत्य मुंबईच्या दिशेने निघाले होते. दरम्यान ते मळगाव-वेत्ये परिसरात आले असता मागून येणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यात दुचाकीस्वार पती रस्त्याच्याकडेला फेकला गेला. यात त्याला मोठी दुखापत झाली आहे. तर मागे बसलेली पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. मात्र धडक देणाऱ्या कारने त्या ठिकाणावरुन पलायन केले. दरम्यान अपघाताची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात देत जखमींना रुग्णवाहिका बोलून स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =