You are currently viewing विनवणी

विनवणी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची अभंग रचना

देवा पांडुरंगा ! सकलांच्या दाता !!
कोठे ठेऊ माथा ! तूच सांग !!

थकले हे मन ! मागोनिया सुख !!
भोगलेलं दुःख ! कुणा सांगू !!

वाट पंढरीची ! चाललो मी पायी !
मन तुझ्या ठायी ! आधीच रे !!

विनवितो तुज ! नको दूर सारू !!
कसे मी आवरू ! मनासी या !!

झिजले चरण ! टेकता हे हात !!
न सहे आघात ! हृदयासी !!

कुठे कुठे मांडू ! व्यथा या मनाच्या !!
तूच अंतरीच्या ! गाभाऱ्यात !!

भक्त म्हणे विठू ! जगाचा पोशिंदा !!
चरणाशी वंदा ! भक्तिभावे !!

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६
१५ नोव्हेंबर २१

प्रतिक्रिया व्यक्त करा