डोळे…
डोळे...

डोळे…

हसतात डोळे,
हसवतात डोळे..
मनातल्या भावना
न बोलताही,
समजणाऱ्यालाच,
सांगतात डोळे…

शरमतात डोळे,
लाजतात डोळे,
फक्त एकाच कटाक्षाने..
मला, त्याला, तिला..
लाजवतातही डोळे..

रडतात डोळे..
रडवतात डोळे..
अश्रूंनाही वाहण्या..
केव्हा केव्हा मोकळे
सोडतात डोळे..

निस्तेज डोळे..
हरवलेले डोळे..
विसरुनी जगाशी,
एकांतातही एकांत,
शोधतात डोळे..

पाणावतात डोळे..
डुबतात डोळे..
असह्य वेदनेने,
कधीतरी आपसूकच,
मिटतात डोळे…

सोबत असूनही…
साथ सोडून जातात डोळे…!!

(दीपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा