You are currently viewing सहा ऋतूंचे सहा सोहळे

सहा ऋतूंचे सहा सोहळे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सहा ऋतूंचे सहा सोहळे*

 

ऋतुपरत्वे होती साजरे

सहा ऋतुंचे सहा सोहळे

चक्र फिरता येती क्रमाने

एक-एकाचे रुप आगळे

 

राहे अखंड कशी साखळी

मने गुंतली मैत्री जमली

राग-मत्सर पळ काढती

याच कारणे बहु रमली

 

लय-उत्पत्ती सत्य युगाचे

घेता निरोप एक-दुजांचे

ध्यानी ठसवा करा निश्चित

लक्ष्य एकच सुख सर्वांचे

 

सांगे वेदना जाता शिशिर

नको काळजी म्हणे वसंत

गुढी उभारी नव्या दमाची

लागे कामास नसे उसंत

 

फुटे पालवी झाडे सजली

फुले रंगीत गोड संगीत

पिक गायन शीत पवन

सृष्टी बदल होती लयीत

 

विजया केळकर_______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा