You are currently viewing दर्शन

दर्शन

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

मी असा नवहतोच कोठे
काल ही वा आज ही
ना स्पर्श ही ना दृश्य ही
ना शब्द वा आवाज ही

मोकळ्या माझ्या मनाच्या
गंध गाभार्यात भरला
हळुच हा हळुवार तेंव्हा
छंद ही स्वच्छंद बनला

श्वास आणी ध्यास यांचा
हलकेच हलका मेळ जमला
हाच प्रभुच्या दर्शनाने
स्पंदनांचा खेळ रमला

हीच अनुभूती असावी
विसर माझा मज असावा
असलो जरी कोठे कधी
चित्ती गजानन साठवावा

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + fourteen =