You are currently viewing धनगर समाजाला न्याय द्यायचा असेल तर एकत्र येऊन संघर्ष करा, युवा वर्गाची गरज लागेल तिथे ठामपणे महासंघासोबत उभे राहू

धनगर समाजाला न्याय द्यायचा असेल तर एकत्र येऊन संघर्ष करा, युवा वर्गाची गरज लागेल तिथे ठामपणे महासंघासोबत उभे राहू

– कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांचे प्रतिपादन

मुंबई

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश च्या वतीने घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व धनगर समाज जनजागृती अभियानाचे आयोजन मुंबई येथील चेंबूर घाटला येथे आगरी हॉल मध्ये करण्यात आले होते. महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.संपतराव शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष येळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सभेत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलत असताना काळे म्हणाले की, वैभववाडी तालुका सदस्य ते कोकण प्रदेशाध्यक्ष हा महासंघा मधील प्रवास माननीय प्रवीण काकडे साहेब यांच्या मुळेचे यशस्वी झाला. वैभववाडी तालुका अध्यक्षपदी निवड केल्यानंतर एकटा अध्यक्ष एकटा सदस्य अशी परिस्थिती वैभववाडी तालुक्याची होती. तालुक्यातील धनगर समाजवाडी वस्तीवर जाऊन समाजाचे प्रश्न जाणून घेतले ज्या वाडीचे काम करायचे त्या वाडीतील समाज बांधव सोबत घेऊन समाजाच्या प्रश्नांवर ते आवाज उठवले व ते सोडवण्यास यश प्राप्त केले. पहिल्यांदा विरोध मोठ्या प्रमाणात झाला परंतु त्याच प्रमाणे समर्थनही वाढू लागले आणि धनगर समाजाचे हळूहळू कार्यकर्ते महासंघात जोडू लागले जोडलेला कार्यकर्ता आम्ही तोडून दिला नाही महासंघाचा पाया मजबूत करून आज राज्याप्रमाणेच कोकण मध्ये महासंघाचे संघटन मजबूत केले. कोकण प्रदेश मधील सर्व धनगर समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे साहेब यांचे योगदान मोलाचे आहे. या योगदानाला आपणही हातभार लावावा यासाठी समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे. सतराव्या शतकात कोणतेही प्रसार माध्यम नसताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महिलांच सैन्य उभं केलं होतं, आपण एकविसाव्या शतकात आहोत अनेक माध्यम आपल्याकडे आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज एकीकरण करण्यासाठी सोपे जाईल. कोणतेच माध्यम नसताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सतराव्या शतकात महिलांचा सैन्य उभे केलं होते, आपल्याकडे तर आता सर्व माध्यम असताना आपण का शक्य करू शकत नाही समाजाला न्याय द्यायचा असेल तर संघर्ष केला पाहिजे आणि हा संघर्ष सर्वांनी एकत्र येऊन केला तर अशा संघर्षाला यश आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ब्रीद वाक्यचे उदाहरण देत शिक्षणाने संघटनाचे महत्त्व आपल्याला कळेल, आपले संघटन होईल, संघटन करून केलेल्या संघर्षाला निश्चितच यश मिळेल. त्यामुळे 21व्या शतकात अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या धनगर समाजाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले. एकविसाव्या शतकामध्ये आपलं जीवन जगत असताना रस्ता पाणी अशा मूलभूत गरजांपासून आपण वंचित आहोत,आरक्षण आमचा हा महत्त्वाचा मुद्दा आहेच त्याचबरोबर माझ्या वाडी वस्तीतील विद्यार्थी शाळेत गेला पाहिजे, त्यासाठी वाडीतून शाळेपर्यंत रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे, 21व्या शतकात जिवंत माणसाला आजारी पडल्यानंतर, गरोदर महिला, वृद्ध डोलीतून घेऊन जावं लागतं कोणता कार्यक्रम असेल तर चार-चार पाच-पाच किलोमीटर पायपीट करत कार्यक्रमाला लागणारे साहित्य घेऊन जावं लागतं यासाठी प्रत्येक धनगर वस्ती वरती दळणवळणाची सोय होणे अत्यंत गरजेचे आहे. धनगर वस्तीवर पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे, पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन समाजाला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. महासंघाने रस्ता पाणी अशा अनेक मूलभूत गरजांबाबत देखील प्रशासनाकडे आवाज उठवावा ज्या ज्या ठिकाणी युवक आघाडी ची गरज भासेल त्या त्या ठिकाणी युवक आघाडी सक्षम पणे महासंघाच्या सोबत उभे राहील असा विश्‍वास देत नवलराज काळे यांनी धनगर समाजाला संघर्षासाठी एकत्र येण्यास आवाहन केले. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमास राज्य सचिव नयन सिद राज्य संघटनमंत्री दयानंद ताटे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष कविता कोकरे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष केशवराव कस्तुरे मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्ष ललिता हराळे ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब गोरड. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजयराव गोरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी शिंदे पालघर जिल्हाध्यक्ष महिला सारिका बोडेकर प्रदेश बापूसाहेब खरात कोकण सोशल मिडीया प्रमुख हर्षद फाले कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा अध्यक्ष,विजय यमकर सातारा जिल्हा सोशल अध्यक्ष सल्लागार उत्तमराव सातपुते संजय सातपुते दरयाबा कोळेकर गणेश शिंगाडे सातारा जिल्हा अध्यक्ष सागर डोबाळे जगन्नाथ काकडे सुभाषराव एडके शहाजीराव पाटील. प्रास्ताविक मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे यांनी केले आभार राज्य महासचिव नयन सिद यांनी मानले याप्रसंगी समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा