वैभववाडी रुग्ण संख्या ८० वर पोहोचली. . .
Digital

वैभववाडी रुग्ण संख्या ८० वर पोहोचली. . .

आज कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले; रुग्ण संख्या ८० वर पोहोचली

वैभववाडी प्रतिनिधी :-

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी तालुक्यात दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ८० वर पोहोचली आहे. वैभववाडी शहरातील ते दोन रुग्ण आहेत. त्यांना सांगुळवाडी येथील कोव्हीड कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.

वैभववाडी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ९ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. बाजारपेठ बंद असल्याने नागरिक व ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पुढील काळात रुग्ण आढळून आल्यास तो भाग कंटेन्मेन झोन करावा व उर्वरित बाजारपेठ सुरू ठेवावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा