You are currently viewing तळवडे येथे बँक ऑफ इंडियाचे “एटीएम” अज्ञाताने फोडले…

तळवडे येथे बँक ऑफ इंडियाचे “एटीएम” अज्ञाताने फोडले…

बँक अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी रवाना; अधिक तपास सुरू…

सावंतवाडी

तळवडे येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञाताकडून फोडण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान याबाबतची माहिती स्थानिकांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तर याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस त्याठिकाणी रवाना झाले आहेत. मात्र हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने घडला हे पोलीस तपासानंतर उघड होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञाताकडून संबंधित एटीएम मधील मशीन फोडण्यात आले आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान ही घटना आज सकाळी तेथीलच काही स्थानिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली. व सावंतवाडी पोलिसांना त्याठिकाणी पाचारण केले आहे. मात्र हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने घडला, हे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर उघड होणार आहे. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, पोलीस बाबू तेली, ग्रामपंचायत सदस्य मंगलदास पेडणेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =