You are currently viewing काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

१५ दिवसात चौकशी न झाल्यास पालकमंत्री व गृहराज्यमंत्र्यांकडे दाद मागणार

​कणकवली :

​कणकवली तालुक्यात वागदेत ३० ते ३१ ऑक्टोबर रोजी साईबाबा सोशल क्लब येथे कॅरम स्पर्धा आयोजीत केली होती. क्लबमध्ये जुगाराचा अड्डा, रमी, तीन पत्ती ​सारखे बेकायदेशीर उद्योग चालतात. लोकांनी वारंवार याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. असे असताना कणकवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक शरद देठे हे या क्लबने आयोजीत केलेल्या कॅरम स्पर्धेस उपस्थित राहतात व प्रोत्साहन देतात. अशी तक्रार काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. अप्पर पोलीस अ​धिक्षक नितीन ​बागाटे​​ यांच्याशी या संदर्भात मांजरेकर यांनी तक्रार देत चर्चा केली. या निवेदनात म्हटले आहे, जुगार चालणाऱ्या क्लबला प्रोत्साहन पोलिसांनी देणे हे योग्य नाही. या क्लब मधून कणकवली पोलिसांकडून महिना ४० हजार रुपयांचा हप्ता घेतला जातो असे ऐकिवात आहे असा दावा देखील मांजरेकर यांनी या निवेदनात केला आहे. कणकवली तालुक्यात असे अनेक बेकायदेशीर व्यवहार पोलिसांच्या वरदहस्ताने जोरदार चालू आहेत. तरी या अधिकाऱ्यांचे या बेकायदेशीर धंद्यामध्ये काय लागेबांधे आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी मांजरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे भेटीदरम्यान केली आहे. तसेच याबाबत येत्या ​१५ दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई झाली नाही तर पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांच्याकडे दाद मागणार असल्याचा इशारा देखील मांजरेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 20 =