You are currently viewing कणकवली वागदे येथे कंटेनर पलटी

कणकवली वागदे येथे कंटेनर पलटी

कणकवली

मुंबई-गोवा हायवे महामार्गावर कणकवली नजीक वागदे येथे सायंकाळी 6 .30 च्या दरम्यान कुडाळ ते कणकवलीच्या दिशेने जाणारा कंटेनर वागदे पाताडे स्टॉप येथे पलटी होत चालक गंभीर जखमी झाला आहे. घटना समजताच स्थानिक वागदे रहिवाशी संदीप सावंत, रुपेश आंमडोसकर, दीपक गोसावी,ललित घाडीगांवकर, पिंट्या ताटे,समर सिंग,धीरज चरपे, यांनी मदत कार्य करत गंभीर जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या रुग्णवाहिने अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केले .घटनेची माहिती समजताच वाहतूक पोलीस व कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा