You are currently viewing इंदिरा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय काँग्रेस कणकवली तर्फे  वकृत्व स्पर्धेचे आयोजन

इंदिरा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय काँग्रेस कणकवली तर्फे  वकृत्व स्पर्धेचे आयोजन

कणकवली

राष्ट्रीय काँग्रेस कणकवली आयोजित इंदिरा गांधी जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा दिनांक०४-११-२०२१ ते दिनांक१७-११-२०२१ पर्यंत खाली नमूद केलेल्या विषयांवरती भाषणाचा चार ते पाच मिनिटांचा व्हिडिओ करून तो खालील लिंक वर अपलोड करावा. व्हिडिओ करत असताना स्वतःची ओळख करून देऊन आणि स्वतःचा मोबाईल नंबर सांगून नंतर स्वतः कॅमेरा समोर उभे राहून व्हिडिओ करावा. कृपया स्वतःचा नंबर आणि नाव नमूद करण्यास विसरू नये.विजेत्यांची नावे१९-११-२०२१ रोजी जाहीर करण्यात येतील. यांना खालील प्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. फेसबुक वर मिळालेल्या लाईक्स वरती विजेत्यांची निवड केली जाईल.
पहिले बक्षीस-१०००रु आणि सन्मानचिन्ह
दुसरे बक्षीस-७००रु आणि सन्मानचिन्ह
तिसरे बक्षीस-५००रु आणि सन्मान चिन्ह
स्पर्धेचे विषय:-
१) इंदिराजींचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग.
२) इंदिराजींचा राजकीय प्रवास.
३) इंदिराजींची पंतप्रधानपदाची कारकीर्द.
सदर विषयांवरील त्यांचा व्हिडिओ करून https:// www.facebook.com/profile.php?id=100052643560641 या लिंक वर अपलोड करावा सदर लिंक ही कणकवली फेसबुक वर राष्ट्रीय काँग्रेस कणकवली या नावाने उपलब्ध आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक मिळतील तो स्पर्धक विजेता म्हणून घोषित केला जाईल आणि स्पर्धकांना दिनांक१९-११- 2021 रोजी इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलावण्यात येईल आणि त्यांना आपले भाषण प्रदर्शीत करण्याची संधी दिली जाईल. व्हिडिओ अपलोड करत असताना कोणतीही अडचण आल्यास खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुमचा व्हिडिओ व्हाट्सअप करावा.

श्री. प्रदीप मांजरेकर.
तालुका अध्यक्ष
राष्ट्रीय काँग्रेस
९४२२४३६८८०.
श्री महेश तेली
शहराध्यक्ष
‌‌ ८५३०६०६७४८.
राष्ट्रीय काँग्रेस

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 7 =