You are currently viewing कंत्राटी कर्मचार्‍यांचे महावितरण उपविभाग, सावंतवाडी कार्यालयासमोर आमरण उपोषण

कंत्राटी कर्मचार्‍यांचे महावितरण उपविभाग, सावंतवाडी कार्यालयासमोर आमरण उपोषण

सावंतवाडी

तुकाराम गणपत शिरोडकर, दिपक दत्‍ताराम निवळे, प्रकाश गंगाराम धुरी हे कर्मचारी गेली काही वर्षे महावितरण कंपनीद्वारे सावंतवाडी तालुक्यात कंत्राट पद्धतीने सेवा देत आहेत. मात्र राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. ही कारवाई बेकायदेशीर व नियमबाह्य आहे. या नोकरी कालावधीत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही. शिवाय कोरोना काळात त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिलेली असून चांगल्या वसुलीबाबत महावितरण कडून प्रशस्तीपत्रकही देण्यात आले होते. ग्रामपंचायत कडूनही चांगली सेवा दिल्याबद्दल सन्मान पत्र मिळाले होते. मात्र कोणतीही चूक नसतानाही त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी सत्य परिस्थिती कथन केली असता त्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही त्यांना आज तारीख पर्यंत कामावर रुजू करून घेण्यात आलेले नाही.

महावितरणच्या या निर्णयामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्हाला कामावर हजर करून घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबीयांसमवेत विद्युत महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, जि प सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, नगरसेविका अनारोजिन लोबो, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी सरपंच मारिया डिमेलो, सदस्य बंड्या घोगळे, सदस्य संदीप गवस, दिनेश हरमलकर, योगेश निवळे, योगेश पिकुळकर, दाजी साटेलकर, बाळा सावंत, दिलीप मिसाळ, एकनाथ हळदणकर, योगेश नाईक या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा