You are currently viewing कणकवली, कुडाळ मध्ये युवासेनेच्या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली, कुडाळ मध्ये युवासेनेच्या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा केला निषेध

आ.वैभव नाईक सायकल चालवत मोर्चात झाले सहभागी

केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेल च्या दरात दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत.यापार्श्वभूमीवर युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कणकवली व कुडाळ येथे भव्य सायकल मोर्चा काढण्यात आला.कणकवली येथील मोर्चाचे नेतृत्व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले होते. आ.वैभव नाईक स्वतः सायकल चालवत सायकल मोर्चात सहभागी झाले. या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून ते हायवेवरून पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्गे ढालकाठी येथून तेलीआळी मार्गे छ.शिवाजी महाराज चौकातून शिवसेना मध्यवर्ती कार्यालया पर्यंत हा सायकल मोर्चा काढण्यात आला.तर कुडाळ येथे गुलमोहर हॉटेल ते जिजामाता चौक पर्यंत भव्य सायकल मोर्चा काढण्यात आला.
केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा.इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी कुडाळ येथे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, युवासेना समन्वयक सुशील चिंदरकर, तालुकाप्रमुख योगेश धुरी,सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अनुराग सावंत अमित भोगले, मंजू फडके,चिन्मय पोईपकर, संदीप म्हाडेश्वर,चेतन पडते, दिनार पडते आदी.
कणकवली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सचिन सावंत,नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, समन्वयक राजू राठोड, कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर,तेजस राणे,रिमेश चव्हाण,आदींसह युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − fifteen =