You are currently viewing शिंदे -फडणवीस ह्या बिल्डर धार्जिण्या सरकार मुळे रेरा, ग्राहक संरक्षण आयोग, उपनिबंधक कार्यालयातील कामे ठप्प, जनता वाऱ्यावर….

शिंदे -फडणवीस ह्या बिल्डर धार्जिण्या सरकार मुळे रेरा, ग्राहक संरक्षण आयोग, उपनिबंधक कार्यालयातील कामे ठप्प, जनता वाऱ्यावर….

*शिंदे -फडणवीस ह्या बिल्डर धार्जिण्या सरकार मुळे रेरा, ग्राहक संरक्षण आयोग, उपनिबंधक कार्यालयातील कामे ठप्प, जनता वाऱ्यावर —*

*काँग्रेस प्रवक्ता ॲड धनंजय जुन्नरकर*

मुंबई :

ग्राहकांची फसवणूक टाळणे आणि “स्थावर मालमत्ता” क्षेत्रात “पारदर्शकता” आणणे या उद्देशाने स्थावर संपदा अधिनियम 2016 हा कायदा हा कायदा पारित करण्यात आला.परंतु महाराष्ट्रातील बिल्डर धार्जीणे शिंदे आणि फडणवीस सरकार, यांच्या संगनमतामुळे सामान्य ग्राहकांच्या हिताला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत.
असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रवक्ता ॲड. धनंजय जुन्नरकर ह्यांनी केला आहे. रेरा, ग्राहक संरक्षण आयोग, सहकार निबंध कार्यालयात सुनावण्या बंद असून त्यांच्या रिक्त जागाही जाणीवपूर्वक भरल्या जात नाहीए. सुनावणी न घेता पुढच्या तारखा बोर्डावर लावून निबंधक आणि उपनिबंध कार्यालये फक्त सेटिंग च्या कामात गुंतलेली आहेत.
ह्या सर्वांच्या चौकशा करणे व हकालपट्ट्या करणे ह्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे लवकरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही ॲड धनंजय जुन्नरकर म्हणाले.
गृहनिर्माण मंत्रालय आणि गृह मंत्रालय दोन्ही विभाग माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडेच आहेत. भाजपा पुरस्कृत शिंदे सरकार हॆ बिल्डर आणि उद्योगपती धर्जिणे सरकार महाराष्ट्रात सत्तेत असल्याने साध्या साध्या गोष्टींसाठी देखील सामान्यांना झगडावे लागत आहे.
गृहखरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यात अस्त्वित्वात आलेल्या ‘रेरा’ कायद्याच्या अमलबजावणीतील ढिलाई चुकार विकासकांच्या पथ्यावर पडत असून सर्वसामान्य गृहखरेदीदारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. विहित वेळेत खरेदीदारांना सदनिकांचा ताबा देऊ न शकलेल्या राज्यभरातील १००७ विकासकांच्या ६२४ कोटींच्या प्रकल्पांच्या जप्तीचे आदेश महारेराने बजावले आहेत. मात्र, स्थानिक जिल्हा प्रशासनांच्या ढिलाईमुळे जेमतेम १०५ कोटींची वसुली होऊ शकली आहे.
त्यामुळे घरासाठी आयुष्यभराची मिळकत गुंतवणारे फसवणूक झाल्याने स्वतःला अनाथ झाल्याची भावना व्यक्त करत आहेत.

स्थावर संपदा महाराष्ट्र प्राधिकरणाकडून विकासकांना जप्तीचे वॉरंट बजावण्यात येते. संबंधित विकासकाची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करणे
आणि त्यातून वसुली करण्याचे काम स्थानिक जिल्हा प्रशासन करते. परंतु प्रशासन आणि बिल्डर ह्यांच्या अभद्र युती मुळे सामान्यांना न्याय मिळत नाहीए.

सध्या महारेरा कडे 6,390 प्रकरणे प्रलंबित आहेत.
सुनावण्या नावाला चालू असून मधस्ती साठी अर्ज केलेल्या तक्रारदारांना 3-3 महिने झाले तरी साधे प्रत्युत्तर देणारे इमेल देखील पाठवण्यात येत नाहीए.

महाराष्ट्र मालकी हक्क बाबतचा कायदा अधिनियम 1963 ( मोफा ) कायद्यानव्ये देखील ताबा दिल्यावर 4 महिन्याच्या आत जमिनीच्या मालकी हक्काचे अभिहस्तांतरण करणे क्रमप्राप्त आहे तरी देखील बिल्डर ते करत नाहीत.
सदर गुन्हा दखलपात्र असून त्याला 3 वर्षांची शिक्षा आहे. बिल्डर विरुद्ध सामान्य सदस्य, संस्था पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असता पोलीस त्यांना कोर्टात जायचा सल्ला देऊन परस्पर हाकलून लावत आहेत.
टोकन परत न देणे, खोटे व्याज लावणे, पार्किंग जबरदस्ती ने विकत घ्यायला लावणे असे बिल्डरांचे उद्योग चालू असून रेरा, ग्राहक संरक्षण, उपनिबंधक आणि पोलीस ह्यांच्या कामचुकार पणा मुळे आपल्या आयुष्याची सर्व पुंजी देऊन, सोने नाणे विकूनही सामान्य जनतेवर खस्ता खाण्याची वेळ आलेली आहे.
त्यामुळे सामान्य जनतेमध्ये देवेंद्र फडणवीस ह्यांच्या कार्यशैलीवर प्रचंड असंतोष असल्याचेही जुन्नरकर म्हणाले.

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 15 =