You are currently viewing पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई पदांसाठी 28 व 29 रोजी  मैदानी चाचणी

पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई पदांसाठी 28 व 29 रोजी  मैदानी चाचणी

पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई पदांसाठी 28 व 29 रोजी  मैदानी चाचणी

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 20 पोलीस शिपाई चालक व 21 पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांना दि. 28 व 29 ऑक्टोबर 2021 रोजी कागदपत्र पडताळणी, उंची, छाती मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले असल्याची माहिती पोलीस उप अधिक्षक एस.बी. गावडे यांनी दिली आहे.

            याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पोलीस शिपाई चालक लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या अधारे भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 1:10 प्रमाणे प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्धकरून त्यांना दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7.30 वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे कागदपत्र पडताळणी व उंची, छाती मोजमाप या प्रक्रियेकरीता बोलवण्यात आले आहे.

            पोलीस शिपाई लेखी परीक्षेमध्ये मिळआलेल्या गुणांच्या अधारे भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना 1:10 प्रमाणे प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यांना दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 5.00 वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे कागदपत्र पडताळणी, उंची -छाती मोजमाप व मैदानी चाचणी या प्रक्रियेकरिता बोलवण्यात आले आहे.

            उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी पुढील मुळ कागदपत्रे व त्यांचे स्व साक्षांकित दोन संच सोबत ठेवावेत. दहावी, बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट, पदवी, पदविका धारक, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र ( असल्यास), जन्म दाखला, अधिवास दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, महिला उमेदवारांकरिता नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, भ.ज-क, भ.ज-ड, इमाव, इड्ब्लूएस जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या पुरुष, महिला उमेदवारांना संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेअर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. समांतर आरक्षण (महिलांसाठी 30 टक्के आरक्षण/माजी सैनिक) याबाबतची विधी ग्राह्य प्रमाणपत्रे, हलके वाहन (LMV/LMV-TR) चालवण्याचा वैध परवाना, ओळखपत्र ( आधार कार्ड / मतदान कार्ड/ वाहन परवाना/ पॅन कार्ड इ), ऑनलाईन आवेदन अर्ज, पासपोर्ट साईज 10 रंगीत फोटो, चालक पोलीस शिपाई पदासाठी वयोमर्यादा दि. 30 डिसेंबर 2019 अशी निश्चित करण्यात आली आहे. तीच कागदपत्र पडताळणीबाबतची तारीख अंतिम असेल. तथापि फक्त चालक पोलीस शिपाई पदासाठी LMV किंवा  LMV- TR परवाना उपलब्धतेसाठी दिनांक 8 जानेवारी 2020 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई या पदासाठी वयोमर्यादा ही दिनांक 30 सप्टेंबर 2019 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. तीच कागदपत्रे पडताळणीबाबतची तारीख अंतिम असेल. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून उर्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 मार्च 2019 ते 30 मार्च 2019 या वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर 2019-2020 या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य असलेले अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट विचारात घेण्यात येणार आहे. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक राआधो 4019/प्र.क्र.31/16-अ दि. 6/7/2021 नुसार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षण अथवा अराखीव विकल्पाबाबतच्या ईडब्ल्युएस प्रमाण व नॉन क्रिमिलेअरचे मार्च 2020 चे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

            उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी सिंधुदुर्ग पोलीस भरती मदत केंद्र कक्ष – 02362-228008 किंवा पोलीस नियंत्रण कक्ष – 02362-228614 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही या पत्रकात केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − two =