You are currently viewing पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची!”

पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची!”

*”पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची!”*

*मधुश्री व्याख्यानमाला – पुष्प दुसरे*

पिंपरी

“पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची असते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ एकपात्री हास्यकलाकार गजानन पातुरकर यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक २४ मे २०२३ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘हास्यविनोदातून समाजप्रबोधन’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना गजानन पातुरकर बोलत होते. माजी नगरसेविका शर्मिला बाबर अध्यक्षस्थानी होत्या; तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष भगवान महाजन, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; त्याचप्रमाणे विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.

गजानन पातुरकर पुढे म्हणाले की, “दिवसेंदिवस सुसंवाद, वाचन या गोष्टी झपाट्याने कमी होऊ लागल्या आहेत. आताच्या यांत्रिक जीवनात सुखकर जगण्यासाठी सकारात्मकता आचरणात आणण्याची गरज आहे. पाहाल तशी दुनिया आहे; त्यामुळे जगाकडे हसून पाहिले तर जगदेखील तुमच्या हास्यात सहभागी होईल. माणूस हा एकमेव हसणारा प्राणी असल्याने संधी मिळेल तेव्हा मनमुरादपणे हसा. हसल्याने रक्ताभिसरण चांगले होते. पुस्तके वाचताना माणसेही वाचायला शिका!”

शेरोशायरी, कविता, किस्से, विनोद यांची पखरण करीत पातुरकर यांनी बदललेल्या जीवनशैलीतील स्थित्यंतरे मार्मिकपणे मांडून श्रोत्यांना खळखळून हसवले. हसण्याचे प्रकार, सुप्रसिद्ध सिनेकलावंतांचे आवाज आणि “येरे येरे पावसा…” ही बालकविता वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजात सादर करीत त्यांनी रसिकांकडून उत्स्फूर्त हशा अन् टाळ्या वसूल केल्या. मोबाइलचे दुष्परिणाम सांगून ‘आई’ या कवितेने आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना गजानन पातुरकर यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले.

शर्मिला बाबर यांनी शुभेच्छा दिल्या. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक केले. अजित देशपांडे यांनी परिचय करून दिला. राज अहेरराव यांनी स्वागत केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले. अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + seven =