सिंधुदुर्ग सेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची घेतली भेट..

सिंधुदुर्ग सेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची घेतली भेट..

सावंतवाडी

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.यावेळी सावंतवाडी शहर व तालुक्यातील विकासकामांबाबत चर्चा झाली. विकासात्मक आढावा घेण्यासाठी लवकरच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली जाईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी तालुक्यातील अनेक विकासात्मक कामाबाबत चर्चा करत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अनेक अडचणी व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान बाबत चर्चा केली तसेच सावंतवाडी शहरातील नगरपालिका प्रशासनाने केलेल्या अनेक कारवाई व स्थानिक समस्यांबाबत सुद्धा चर्चा झाली. पालकमंत्र्यांनी आपण लवकरात लवकर सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेतो असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नगरसेविका सौ. अनारोजीन लोबो उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा