You are currently viewing बांदा शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी खात्यात जमा करा – बांदा व्यापा-याची मागणी

बांदा शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी खात्यात जमा करा – बांदा व्यापा-याची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तर्फे सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

बांदा
शहरात २३ जुलैच्या आलेल्य़ा महापुरामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शासनाने पाठवलेली नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.अशी मागणी बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यानी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या जवळ लावुन धरली. यावेळी बांदा व्यापारी संघाचे खजिनदार मंगलदास साळगावकर,बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नेाडकर,बाळा पेडणेकर,शितीज भाेगटे, प्रसन्ना पावसकर,देवांग शेर्लेकर,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे जिल्हा उपाध्यष मिलिंद धुरी, जिल्हा सचिव राकेश केसरकर,साेशल मिडीया प्रमुख आनंद कांडरकर उपस्थित हाेते.तसेच आतंरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असाेसीएशन संघटनेच्या वतीन दिवाळीे पुर्वी पुरग्रस्त व्यापा-याच्या खात्यात नुकसान भरपाई जमा न केल्यास लाक्षणिक उपाेशणाचा इशारा देण्यात आला.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यानी २८ ऑक्टोंबर पर्यत व्यापा-याच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येईल असे आश्वासम दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =