You are currently viewing वेंगुर्ले नवाबाग किनाऱ्यावर जाळ्यात सापडला “बंपर बांगडा”

वेंगुर्ले नवाबाग किनाऱ्यावर जाळ्यात सापडला “बंपर बांगडा”

वेंगुर्ले
मत्स्य खवय्यांसाठी चांगली बातमी आहे. गुरुवारी रात्री नावाबाग समुद्रात बांगडा मासा मोठ्या प्रमाणात मिळाल्याने किनाऱ्यावर मासे घेण्यासाठी व पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. या बंपर मासळी मुळे खवय्यांची चंगळ झाली परंतु तेवढ्या प्रमाणात बर्फ न मिळाल्याने कमी किमतीमध्ये मच्छिमारांना या माशांची विक्री करावी लागली आहे. त्यामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी पसरली आहे.
नवाबाग किनाऱ्यावरून मासे पकडण्यासाठी संध्याकाळी समुद्रामध्ये एकाच वेळी नौका निघतात आणि मासेमारी करून या नौका रात्री उशिरा किनाऱ्यावर येतात. सध्या मासेमारी हंगाम जोमात सुरू आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात जाळ्यात मासळी मिळत नव्हती. मात्र काल रात्री आलेल्या सगळ्याच नौकांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळाला. काही नौका मध्ये प्रमाणापेक्षा जास्त मासा असल्याने यातील दोन नौका किनाऱ्यावर बुडाल्या. त्या नौका शिताफीने मच्छिमार बांधवांनी बाहेर काढल्या. तर काही जाळ्यांमधील मासळी काढण्याचे काम आज सकाळपर्यंत सुरू होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा