You are currently viewing आंगणेवाडीतील भराडी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले…

आंगणेवाडीतील भराडी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले…

कोविडच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी सूचनांचे पालन करावे…

दर्शनाची वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ६

मालवण

कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील प्रसिद्ध श्री भराडी देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले आहे. भाविकांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत देवीचे दर्शन घेता येणार आहे.
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी कोरोना महामारी संबंधित शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे आंगणे कुटुंबीयांनी नेमलेल्या स्वयंसेवकांनी केलेल्या सूचनांचे पालन करूनच मंदिरात प्रवेश करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
भाविकांनी दर्शनास येताना कोणतेही पूजा साहित्य, ओटी, प्रसाद वैगरे आणू नये तसेच मंदिरात ठेवू नये. मंदिरात देवीच्या होणाऱ्या विविध धार्मिक विधीसाठी दर्शन बंद ठेवण्याचा अधिकार आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांचा असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 7 =