You are currently viewing माडखोल धवडकीत इनोव्हा कारची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर

माडखोल धवडकीत इनोव्हा कारची दुचाकीला धडक दुचाकीस्वार गंभीर

सावंतवाडी

सावंतवाडी बेळगाव रस्त्यावरील माडखोल धवडकी येथे इनोव्हाकारची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात पशुवैद्यकीय परिचय डॉ.अनंत परब (५५, रा. भटवाडी, सावंतवाडी ) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अपघातानंतर इनोव्हा कारचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे दाणोली फाट्यावर असलेल्या पोलीस चौकीलगत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सदर इनोव्हा चालक हा मुंबईतील असून त्याचे नाव फौजदार शेख असे आहे.

दरम्यान, जखमी दुचाकीस्वार डॉ. परब यांना सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सावंत यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघाताची खबर मिळताच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर व रवी जाधव यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली. उपचारानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा