You are currently viewing वैभववाडी न.पं. प्रभाग क्र.७ मधील भालचंद्र रावराणे यांच्या प्रचार कार्यालयाचे झाले उद्घाटन

वैभववाडी न.पं. प्रभाग क्र.७ मधील भालचंद्र रावराणे यांच्या प्रचार कार्यालयाचे झाले उद्घाटन

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला शुभारंभ

वैभववाडी :

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीमध्ये क्र ७ मधील उमेदवार भालचंद्र मारुती रावराणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले.

भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार भालचंद्र मारुती रावराणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. भालचंद्र रावराणे यांचा व्यक्तिगत प्रचारावर भर असून त्यांना मतदारांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर प्रभाग क्र.७ मधून भारतीय जनता पक्षाचे तरुण आणि समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असलेले उमेदवार भालचंद्र रावराणे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे आमदार नितेश राणे यांनी विश्वास व्यक्त केला.

सदर प्रचार कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमांस भाजपा तालुका अध्यक्ष नासिर काझी, भालचंद्र साठे, उमेदवार भालचंद्र रावराणे,प्रकाश पाटील,रमेश रावराणे,सुनिल भोगले,बाळा हरियान,अनिकेत सावंत व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा