You are currently viewing वृक्षारोपण हे भविष्याच्या दृष्टीकोनातुन केलेली प्राणवायुची तरतूद –  शितल आंगचेकर…

वृक्षारोपण हे भविष्याच्या दृष्टीकोनातुन केलेली प्राणवायुची तरतूद – शितल आंगचेकर…

वेंगुर्ले

मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली कारण मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल आहे. परंतु आजच्या संकटाचा अभ्यास करत उत्तम आरोग्य व ऑक्सिजनची तरतूद करण्यासाठी, भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार करता, वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपण राबवत असलेली संकल्पना स्तुत्य आहे. असे प्रतिपादन वेंगुर्ले न.प. उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी केले. वेंगुर्लेतील वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
संत निरंकारी मंडळाच्या “एकता वन” या परीयोजने अंतर्गत वृक्षारोपण अभियान सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने वेंगुर्ला कॅम्प परिसरात राबविण्यात आले. शासकीय जमिनीवर संत निरंकारी मंडळ ब्रेंच मातोंड यांच्या तर्फे उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांच्या हस्ते सदर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी नगरपरिषदेतर्फे संत निरंकारी मंडळाचे आभार मानले. या वेळी कुडाळ ब्रांच मुखी श्री गुरुनाथ म्हाडदळकर, वेंगुर्ला ब्रांच मुखी श्री. जनार्दन शिरोडकर आणि तालुक्यातील निरंकारी भक्तगण उपस्थित होते. सदर अभियान सेवादल युनिट इन्चार्ज श्री शिवराम सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -19 च्या शासकीय निर्देशानुसार यशस्वी करण्यासाठी सेवादल बंधू भगिनींनी बहुमोल सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा