You are currently viewing कर्णबधिर अपंगांना मिळणार वाहन चालविण्याचा परवाना
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

कर्णबधिर अपंगांना मिळणार वाहन चालविण्याचा परवाना

लेख सादर: अहमद नबिलाल मुंडे

आज अपंगांसाठी अनेक वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यामुळे समाजातील वंचित समाजाला जाणारा घटक पुन्हा उच्च स्तरावर येईल व यावा यासाठी शासन वेळोवेळी आदेश शासन निर्णय जारी करत आहे पण त्यावर खऱोखरच अंमलबजावणी होते कां हे पाहणे सुध्दा तेवढेच गरजेचे आहे
शासनाने पत्र क्र. एम व्हि आर. 217/ सी आर -5/ का 2 (२) जा क्र ५२०२ दि ३१/०३/२०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कर्णबधिर अपंगांना वाहनं चालविण्याचा परवाना देणे साठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ८ मधील तरतुदीनुसार कलम ७ चे तरतुदीनुसार व अधिन राहून अर्जदार व्यक्तिस शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्याची तरतूद आहे. याकरिता नमुना अर्ज २ व त्यासोबत नमुना १ शारीरिक योग्यता संबधीचा अर्ज व प्रतिज्ञा पत्र तसेच नमुना १- अ वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे व घेणे गरजेचे आहे नमुना १ मध्ये अर्जदारास त्यांना नेहमीचे आवाज व आवाजाचे सिग्नल ऐकू न येण्याइतके आणि हलके मोटर वाहन चालविण्यासाठी अर्ज केला असेल तर हिंअरीग एड लावून किंवा न लावता तो सिग्नल ऐकू शकतो किंवा येण्याइतके बहिरे आहेत का याबाबत नमुद करणे गरजेचे आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना १ -अ मध्ये वैद्यकीय अधिकाराच्या मते अर्जदार ईतपत बहिरा आहे का की ज्यामुळे नेहमीचे आवाज सिग्नल ऐकू शकणार नाही याबाबत प्रमाणित करावयाचे आहे.
कर्णबधिर अर्जदारांना अनुज्ञप्ती जारी करताना अनुज्ञप्ती प्राधिकारयाना येणार्या शंका खालील प्रमाणे असतात
* वाहन संबंधित कर्णबधिर व्यक्तिचे नावे आवश्यक आहे
* अनुज्ञप्ती जारी करताना या व्यतिरिक्त पूर्णवेळ/ अर्धवेळ वाहचालविणयाची परवानगी देणे याची कायदे / नियमात कोठेही तरतूद नाही
* वाढिव खबरदारीचा उपाय म्हणून चालक कर्णबधिर असलेबाबतचे चिन्ह वाहनांवर प्रदर्शित करण्यात यावे तथापि ते बंधनकारक नाही
* विहित नमुन्यातील वैद्यकीय दाखला असल्यास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी/ प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पुन्हा कर्णबधिर व्यक्तिची श्रवनचाचणी घेण्याची आवश्यकता नाही
याबाबत आपणास पुन्हा सूचित करण्यात येते की उपरोक्त दि ३१/०३/२०१७ रोजीचे पत्राद्वारे मोटार वाहन कायद्यातील कलम ८ कलम ७ मधील तरतुदी मा उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचें दि २८/१०/२०१६ रोजी चया पत्रात नमूद करण्यात आले आहे. अपंग कर्णबधिर अपंगांना अन्य सर्वसाधारण व्यक्तिची वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती जशी चाचणी घेण्यात येते त्याचप्रमाणे त्यांची वाहन चालविण्याची चाचणी घेऊन गुणवततेप्रमाणे अनुज्ञप्ती देण्याची कार्यवाही करावी. या सूचनेचे काटेकोर पालन करून अनुज्ञप्ती अर्ज करणारे कर्णबधिर यांना हवे ते सहकार्य करावे
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा