You are currently viewing जगण्यातील टप्पे:

जगण्यातील टप्पे:

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे लिखित अप्रतिम लेख*

*जगण्यातील टप्पे:*
*एक मनोगत*
***
सर्वसाधारणपणे वयाच्या पंचविशी पर्यंत मानवी जीव बिनधास्त असतो.मज्जाच मज्जा एव्हढेच एक ध्येय असते. परिस्थितीची जाण नसते. शालेय जीवना नंतर ही वृत्ती जरा जास्तच जोर धरते/फोफावते.काॅलेज जीवनाचं आकर्षण,मुलामुलींचा घोळका,गप्पांचा कट्टा हे बघून ह्या पलिकडे काही जीवन असूच शकत नाही अशी धारणा पक्की होत जाते.तारूण्याला भोवतालचं काही दिसतंच नाही हे मात्र खरं. कधीकधी शेतात घाम घाळणारा बाप,मजूरी करणारी आई आपल्या शिक्षणासाठी पैसे कसे जमा करत असतील हेही जाणवत नाही.फाटकी बंडी घालणारा बाप/ लुगड्याला ठिगळ लावून इज्जत लपविणारी आईही दिसत नाही.फक्त स्वत:च्या आत बघणारं तारूण्य एव्हढं आंधळं असतं?
*याला म्हणावे गाढव युग*

मग दुसरा कालखंड सुरू होतो. नोकरी लागते.लग्न होते.धावपळ,दगदग सुरू होते.नव्या नव्या नोकरीचा व लग्नाचा आनंद ओसरू लागतो.ख-या जीवनाचे,जगण्याचे चटके सुरु होतात. बाॅसचे असमाधान, बायकोचे टोमणे,होणारी कुतरओढ सहनशक्ती वाढवत असते.मधेच चिलीपिली झाली तर त्यांचं टॅंटॅं काही काळापुरतं नवनिर्मितीचा आनंद देत असते,नाही असे नाही. पण जशीजशी त्यांची वाढ होते तशीतशी चिंतेतही वाढ होत असते. त्यांचे शाळा/काॅलेजचे प्रवेश/फी वगैरे आर्थिक बाबी भेडसावू लागतात.तोंडमिळवणी करतांना कस लागतो. नातेवाइकांत येणेजाणे,वेळोवेळी त्यांची मनधरणी करणे,मनं सांभाळणे वगैरे वगैरे नाकी नऊ येणे म्हणजे काय असते याची प्रचिती सतत येत रहाते.कशाला जन्माला आलोत इतकं वाटण्या पर्यंत परिस्थिती चिघळलेली असते.

घरातील वाढत्या लोकसंख्ये बरोबरच घराचे वाढत जाणारे स्क्वेअर फूट,त्यासाठीचे कर्ज.घर मोठं झालं की त्याला लागते फर्निचरची भूक ती भागवतांना होणारी दमछाक.पत(?) सांभाळली जाईल इतकी तरी सजावट. बाजूच्या घरात जे जे आहे ते किंवा त्यापेक्षाही आपल्याकडे जास्त का नाही, ही वाढत जाणारी मत्सर वृत्ती. आणि हिच वृत्ती कधीकधी अवाजवी पैसे कमाविण्यासाठी मूल्यांची पातळी सोडायला लावण्याची वेळ आणते.
सेवानिवृत्ती कडे सरकत असतानाच पुढे प्रश्न उभे असतातच,मुलांचे जाॅब,लग्न त्याची तयारी,ते पार पाडतांना निथळणारा घाम थकव्या कडे कधी लकव्या घेऊन जात असतो.
मानेवर जू ठेवून अहोरात्र गाडं ओढावं लागतं.म्हणून
*याला म्हणावे बैल युग*

सेवानिवृत्तीनंतर जरासा माणूस स्थिरस्थावर होत जातो.चिमणी पाखरं उडून गेलेली असतात तरी काही चिंता,काही लोभ,काही प्रेमजाळ सोडून गेलेली असतात. त्या काठीच्या आधाराने माणूस जमेल तेवढा आनंद घेत (आपापल्या वृत्ती नुसार) जगत असतो ते थेट पंचाहत्तरी पर्यंत.
ह्याच काळात एक जाणीव होत रहाते ती ख-या नात्याची. मुलगाही आपला,मुलगीही आपली, भाऊ/बहिण इतर सर्व नाती आपापल्या जागी असतात. पण आपापल्या जागीच.सर्व परिमेयं सोडवून झाल्यानंतर शिल्लक रहातं एकच नातं- पती-पत्नीचं.अभेद्य ,अतुट व सर्व स्वार्थांच्या पलिकडचं.एकमेकांना तारूण्यात जेवढी एकमेकांची गरज नसते तेवढी किंबहुना त्याहून अधिक गरज असते उतारवयात.आणि ह्याच वयात ही जाणीव अधिक प्रगल्भ होत जाते.
तरूणपणात भौतिक गरजा भागवता भागवता मानसिक प्रेम/आधार द्यायचंच राहून गेलेले असते. ते आता द्यायची वेळ आलेली असते,ते शक्य तेव्हढं भरभरून देण्याचा प्रयत्न करावा,असे मनापासून वाटते.ते देत असताना पंखात नवीन बळ संचारल्याचा भास होत राहतो.
खरं जगणं म्हणजे हेच आहे,हे कळायला लागते.
*याला सुवर्णकाळ जरी नाही म्हटलं तरी सुवर्ण मुलामा दिलेला,मोरपंखी काळ म्हणता येईल.*
आणि खरं तर सर्व आयुष्य याच काळात जगून घ्यावं. मागचं राहिलेलं. पुढचं उधारीवरचं,उद्याचा भरवसा नसलेलं. उमद्या मनानं,सारी किल्मिषं,दुखरा भूतकाळ विसरून जगून घ्यावं,उपभोगून घ्यावं.आनंदानं.
पंच्याहत्तरी नंतर मात्र माणसाच्या स्मरणशक्तीचा क्षय होत जातो.चिडचिड वाढते.अवलंबीतता वाढते.ज्यांच्या साठी आयुष्य खर्ची घातलेलं असतं त्यांना आपण ओझे वाटायला लागतो.जीव जात नाही म्हणून अपरिहार्यपणे जगत रहातो.
माकडचाळे सुरू असतात.वेडेवाकडे वागायला लागतो आपण.ब-याचदा ताळतंत्र सुटलेलं असतं.(अर्थात यालाही काही सन्माननीय अपवाद असतात.)
*हे झाले माकडयुग*

आपलं माकड होणार नाही व आपण शेवट पर्यंत मोरपंखी युगातच जगत राहू अशी खूणगाठ आजच मारून घेऊ या.रडत आलोत पण हसत जाऊयात.
सर्वांनाच मोरपंखी आयुष्यासाठी मंगलमय शुभकामना.

<<<>>>
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
९८९२३३३६८३
दिनांक:- ७/५/२०२३

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + twelve =