You are currently viewing कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा – आ. वैभव नाईक

कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा – आ. वैभव नाईक

कुडाळ तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनतेचा सेवक म्हणून काम केले पाहिजे.संघटना आहे म्हणून आपण आहोत त्यामुळे संघटना वाढीसाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. मतदार संघातील अनेक विकास कामे मंजूर आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कुडाळ मालवण मधील रस्त्यांच्या वर्कऑर्डर झाल्या आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. राज्य सरकार मधील विविध खात्याचे मंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. महिला बाल रुग्णालय, चिपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज येथे भरती प्रक्रियेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करून येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले.
कुडाळ तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे आज संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. वैभव नाईक बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने कुडाळ येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जि. प. गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, विकास कुडाळकर, श्रेया परब, स्नेहा दळवी, राजू कविटकर, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट,मथुरा राऊळ, अतुल बंगे, रुपेश पावसकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी,भुपेश चेंदवनकर, मिलिंद नाईक, अनघा तेंडोलकर आदीसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 13 =