You are currently viewing आयपीेल 2020 च्या पहिल्या सामन्याआधीच राजस्थान रॉयलला धक्का

आयपीेल 2020 च्या पहिल्या सामन्याआधीच राजस्थान रॉयलला धक्का

नवी दिल्ली :

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव स्मिथ, ऑलराउडंर बेन स्टोक्स आणि विकेटकिपर जोस बटलर चेन्नई सुपर किंग्सच्या विरोधातील पहिला सामना खेळू शकणार नाही. यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल 2020 मधील पहिल्या सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्यामुळे विरूद्ध संघाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

२२ सप्टेंबर रोजी शारजाह मध्ये होणाऱ्या राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू जोस बटलरने रविवारी खुलासा केला की, तो यूएईमध्ये क्वॉरंटाईन असल्यामुळे पहिला सामना खेळू शकणार नाही.

स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सही चेन्नई सुपर किंग्सच्या विरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सरचं निदान झालं आहे. त्यामुळे बेन स्टोक्स आपल्या कुटुंबासोबत क्राइस्टचर्चमध्ये आहे. स्टोक्स ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे आणि टी-20 सामन्यांमध्येही सहभागी झाला नव्हता.

तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव स्मिथला इंग्लंडच्या दौऱ्यावर मॅनचेस्टरमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्मिथ चीन वन डे मॅचमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच याच कारणामुळे स्मिथ आयपीएलमध्ये होणाऱ्या राजस्थानच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + six =