You are currently viewing सावंतवाडी येथील मेळाव्यात गाव तिथे मनसेचा झेंडा हि मोहीम जाहीर..

सावंतवाडी येथील मेळाव्यात गाव तिथे मनसेचा झेंडा हि मोहीम जाहीर..

दोडामार्ग कळणे येथे मनसेचे झेंडे फडकले

सावंतवाडी
मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथील मेळाव्यात गाव तिथे मनसेचा झेंडा ही मोहीम जाहीर केली होती.त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यात असलेल्या कळणे या गावामध्ये मनसेचे झेंडे फडकले..

कळणे गावातील कट्टर महाराष्ट्रसैनिकांनी देऊळवाडी, भटवाडी, डबीवाडी, आनंदवाडी, धवडकीवाडी तसेच कळणे बस स्टॉप अशा सर्व मोक्याच्या ठिकाणी मनसेचे झेंडे लावले. गाव तिथे मनसेचा झेंडा मध्ये आता कळणे सामील झाले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर समर्थक अभय पांडुरंग देसाई, जीवन देसाई आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.माननीय श्री परशुराम उपरकर साहेब यांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे प्रत्येक ठिकाणी लावताना मनातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या निवडणुकीत कळणे गावात मनसेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी भावना श्री जीवन देसाई यांनी व्यक्त केली. तर मागील काळात मनसेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही कळणे वासीयांसाठी करून दिली होती असेच अनेक उपक्रम यापुढेही मनसेच्या माध्यमातून कळणे गावात राबवले जातील असे मत अभय देसाई यांनी व्यक्त केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =