You are currently viewing कणकवली येथे इनोव्हा व कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात  सात जण जखमी

कणकवली येथे इनोव्हा व कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात  सात जण जखमी

कणकवली

इनोव्हा व कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने इनोव्हा मधील सात पर्यटन जखमी झाले आहे. हा अपघात आज गडनदी पुलानजीक घडला. त्या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्याने एकाच लेनवर दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याने हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, इनोव्हामधील एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात कार्तिक अशोक खोत (१२), दत्तात्रय आनंदा खोत (४०), बाबुराव शामराव खाटकर (५३), चैतन्य दत्तात्रय खोत (१२), चैताली दत्तात्रय खोत (१४), मनिषा दत्तात्रय खोत (३३, सर्व रा. बाजारभोगवत, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), चालक प्रदीप दिगंबर पोवार (३४, करवीर – कोल्हापूर) हे जखमी झाले.अपघातानंतर नागरीक, महामार्ग विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 5 =