You are currently viewing राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शिरोडा-केरवाडी येथील दिपिका खोबरेकर प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शिरोडा-केरवाडी येथील दिपिका खोबरेकर प्रथम

वेंगुर्ले

विश्व मानसिक स्वास्थ्य दिना निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कोकणकन्या ठरली अव्वल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-केरवाडी येथील विद्यार्थीनी कु. दिपिका राकेश खोबरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत २८ राज्यांमधून स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेच्या युगात स्वतःच आणि पर्यायाने गावच नाव प्रसिद्ध करण्याच प्रत्येकाच स्वप्न असत. परंतु हे स्वप्न पूर्ण त्याचच होत जो या साठी मेहनत घेतो. या स्पर्धेचे विशेष म्हणजे या स्पर्धेत निबंध हा मराठी नाही तरी इंग्रजी भाषेत लिहायचा होता. निबंध स्पर्धांमध्ये प्रथम आलेले राज्यातील ८९५७ स्पर्धक सहभागी झाले होते. दीपिकाने मात्र या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश मिळऊन आपल्या कोकणाचे आणि पर्यायाने केरवाडीचे नाव मोठे केले आहे.

शिरोडा-केरवाडा येथील दीपिका हीचे शिक्षण- 12 वी बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा, अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा येथे झाले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-केरवाडा येथे झाले. तिला शाळेतील शिक्षक यांचे मार्गदर्शन झाले. यापूर्वीही तीने 4 राज्यसयारीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, 2 राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.

दरम्यान या यशात नाव जरी माझे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रमाणे सर्वांचा यात वाटा आहे. माझ्या मते भाषा कोणतीही असो आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवायची इचछा असली की ईश्वर कृपेने सर्व काही साध्य होते. आणि त्यात जर असे पाठिंबा देणारे आई-बाबा, मित्र परिवार आणि शिक्षक भेटले तर हा प्रवास अजून सोपा होतो, असे दीपिका हिने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 4 =