You are currently viewing संत निरंकारी मिशनच्या वननेस-वन परियोजने अंतर्गत सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रात दीर्घकालीन वृक्षांचे रोपण..

संत निरंकारी मिशनच्या वननेस-वन परियोजने अंतर्गत सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रात दीर्घकालीन वृक्षांचे रोपण..

सावंतवाडी

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वननेस-वन या परियोजने अंतर्गत दीर्घकालीन वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी नवीन वृक्षांना जीवन देऊन ईश्वरीय सृष्टी आणि मानवतेची सेवा प्राप्त करण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ब्रांचला मिळाली.

मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीशी मानव झुंजत आहे. कुठे डोंगरी भाग कोसळतो तर कुठे दरड कोसळते, अतिवृष्टी होऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण होते यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता दिसून येत आहे त्याच बरोबर मागील एक वर्षापासून covid-19 या महामारीमुळे प्राणवायू अर्थात ऑक्सीजनचे महत्व व त्याच्या दुष्परिणामांशीही मानव चांगलाच अवगत झाला आहे वरील समस्या ह्या पर्यावरण असंतुलित असल्याने निर्माण झाल्या आणि म्हणूनच समयाच्या सद्गुरुंनी पर्यावरणाचे संतुलन आणि सृष्टी अबाधित राहण्यासाठी वननेस-वन या परीयोजनेचा शुभारंभ २१ ऑगस्ट २०२१ रोजी केला व या वनांचे पालन-पोषण, रक्षण, संवर्धन पुढील तीन वर्ष करण्याचे आदेश समस्त निरंकारी भक्तांना दिला.

तेव्हापासूनच देशभरात विविध ठिकाणी निरंतर शासकीय जमिनीवर या परियोजने अंतर्गत वृक्षलागवड होत असून त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या अनुमतीने कुडाळ ब्रांच मुखी गुरुनाथ म्हाडदळकर यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या covid-19 च्या निर्देशांचे पालन करून दीर्घकालीन वृक्षांचे रोपण केले.

यावेळी शाखा सावंतवाडीमधील निरंकारी अनुयायी व सेवादल युनिटचे इन्चार्ज विलास वर्दम आणि सेवादलचे सदस्य कर्मचारी सहभागी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा