You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शहराच्या वतीने न्यू खासकिलवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियम फवारणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शहराच्या वतीने न्यू खासकिलवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियम फवारणी

मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा पुढाकार

आज मनसेच्या वतीने सावंतवाडीतील न्यू खासकिलवाडा येथे हायपो क्लोराइड सोडियम ची फवारणी सुरु करण्यात आली आहे. मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी यांच्या सहकार्याने व मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून न्यू खासकिलवाडा येथे कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून सोडियम हायपो क्लोराईड फवारणी करण्यात आली.


सावंतवाडी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्वरित श्री. सुभेदार यांनी त्या ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईडला लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून रतिश साठम यांच्याकडे सुपूर्द केल्या व आज पासून न्यू खासकिलवाडा या ठिकाणी फवारणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येणार आहे असे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, लक्ष्मीकांत हरमलकर, रतिश साटम, दिनार तेली, आयुष पवार व धनंजय पाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 18 =