You are currently viewing शिक्षक समिती छेडणार निषेध  आंदोलन.

शिक्षक समिती छेडणार निषेध  आंदोलन.

चंद्रकांत अणावकर यांची माहिती

कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत अपुऱ्या,आणि चुकीच्या माहितीवर, प्राथमिक शिक्षकावर कठोर आणि कडव्या शब्दात टिका करुन प्राथमिक शिक्षकांची प्रतिमा मलीन करुन,प्राथमिक शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी,आणि प्रशासकीय दहशत निर्माण करण्यासाठी जे आरोप प्रत्यारोप करण्यात आले, त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या अस्मितेला ठेच पोचून शिक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
कोरोना आपत्कालीन परिस्थितीनंतर शाळा सुरु करण्यासाठी शासन आणि वरिष्ठ अधिकार्यानी ज्या मार्गदर्शक सूचना आणि आदेश निर्गमित केले आहेत त्यात शाळेची वेळ 1 १०.३० ते सायंकाळी ४.३० असावी, हे निश्चित करुन न देता शाळेचे संनियंत्रण करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत निर्णय घ्यावा असे सूचित केले आहे. शाळेच्या वेळेबाबत शिक्षकामध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे ४ ऑक्टोबरला संघटनेतर्फे गटशिक्षणाधिकारी कुडाळ यांची भेट घेऊन चर्चा केली असता “शाळेची वेळ १०.३० ते ४.३० असेल असे कोणतेही आदेश आपण दिलेले नसून, उद्या नूतन शिक्षणाधिकाऱ्यांनी सहविचार सभेचे आयोजन केले आहे.त्यात वेळे संदर्भात विचारणा करुन नंतर शिक्षकांना कळविण्यात येईल असे सांगितले मात्र त्या नंतर त्यानी कोणतेही लेखी आदेश कळविले नाहीत. शाळा इमारत सफाई, परिसर,संडास,मुतार्या स्वच्छ करणे हा शिक्षकांच्या कर्तव्य सूचीचा भाग नाही शिवाय त्यासाठी शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त केलेले नाही. शाळा व्यवस्थापन समिती,पालक व शिक्षक यांचे सहकार्य घेऊन आजपर्यंत समन्वयाने ही कामे केली जातात मात्र परिसर,संडास,मुतार्या स्वच्छ करणे हे शिक्षकांचे काम आहे असे गृहित धरून शिक्षकांना टार्गेट करणाऱ्यांची कीव करावी असे वाटते. शैक्षणिक वर्ष सुरु होऊन चार महिने संपले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांना १०० टक्के पाठ्य पुस्तके, शैक्षणिक साहित्य पुरविलेले नाही. ऑनलाइन अध्ययन अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणार्या सोयी सुविधा अधिकाऱ्याना उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. बहुसंख्य शाळेकडे नेट प्रॉब्लेम असूनही शिक्षक स्वतःचे साहित्य वापरुन ऑनलाईन अध्ययन अध्यापन करीत आले आहेत. अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे करण्यात आणि कागदी घोडे नाचवण्यात शिक्षकांचा वेळ वाया जातो यावर अधिकारी आणि पदाधिकारी सभेत का चर्चा करत नाहीत? ते मात्र सोईस्कर रित्या विसरले जाते. शिक्षकांना मोठा पगार मिळतो पण काही काम करत नाहीत. फुकट पगार खातात असे शेलक्या शब्दात टिका टिप्पणी करणार्यांना सांगू इच्छितो की ,शिक्षकांना शासन पगार देत आहे. प्रत्येक वेळी शिक्षकांच्या पगाराचा उल्लेख करुन शिक्षकांचा दुस्वास करणार्या ठराविक अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांच्या खिशातील पैशातून पगार दिला जात नाही. सन २०१८-१९ व २०२०-२१ या दोन वर्षांत कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली पावती न देता कर्मचारी/ शिक्षकांकडून निधी संकलित केला त्याचा हिशोब शिक्षकांना अद्याप दिलेला नाही. त्या हिशोबात प्रशासकीय अधिकार्यानी अनियमितता निर्माण केली आहे अशी आमची पक्की धारणा बनली आहे. आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकानी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून वरिष्ठ अधिकार्यानी त्याची चौकशी करावी असे निवेदनही दिली आहेत. त्याची चौकशी व्हावी ही नियोजित आंदोलनात आमची मागणी आहे. २०१९-२० सालातील कला- क्रीडा महोत्सवात केवळ प्राथमिक शिक्षकांना वगळून उर्वरित सर्व खेळाडूना प्रत्येकी ३३५ ₹ किमतीची टी-शर्ट पुरविण्यात आली आणि शिक्षकांना तेथे आलेल्या विक्रेत्यांकडून त्याच प्रकारची टी शर्ट घेण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करुन खेळायला लावले. शिक्षक हे सुध्दा इतर अधिकारी / कर्मचाऱ्यांप्रमाणे आस्थापना घटक असताना असा भेदाभेद करुन शिक्षकांना अपमानित करणे हे पंचायत समितीच्या कोणत्या कायदा नियमात बसते? हे गटविकास अधिकारी सांगतील का ?
कोविड डयुट्यांच्या बाबतीतही एकमेव कुडाळ तालुक्यातच दुजाभाव केला. माध्यमिक शिक्षकांना हया डयुट्यांपासून पूर्णपणे दूर ठेवून फक्त जि.प.चे शिक्षकच आजमितीपर्यत हया डयुटयांसाठी वापरले जात आहेत. जिल्ह्यात कोठेही नाही पण एकमेव कुडाळ तालुक्यात कोणतेही संयुक्तिक कारण नसताना, केवळ शिक्षकांना वेठीस धरण्यासाठी कोव्हिड कक्ष सुरु करण्यात आला. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठी शिक्षकांना कोव्हिड ड्युटीतून कार्यमुक्त करावे असे शासनाचे आदेश असूनसुद्धा अजून शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही.? शासनाचे धोरण, कायदा , पंचायत समितीचे अधिकारी अवलंबीत आहेत व शिक्षकांना बदनाम करीत आहेत त्याचा जाहिर निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबरला दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ या वेळेत सनदशीर मार्गाने, प्राथमिक शिक्षक समितीतर्फे कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 7 =