You are currently viewing तळेरे हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

तळेरे हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

वामनराव महाडीक विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांना प्रोत्साहन मिळावे व मिळालेल्या यशाचे कौतुक व्हावे,या हेतूने दरवर्षी हायस्कूल मध्ये पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे न झालेला सन २०१९-२० व २०२०-२१ चा पारितोषिक वितरण समारंभ कोरोना नियमावलीचे पालन करत यावेळी आयोजित करण्यात आला होता . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या अर्धाकृती पुतळ्याला , सरस्वती देवीच्या मूर्तीला तसेच प्रशालेचे संस्थापक स्व. वामनराव महाडिक यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच कोरोनाने निधन झालेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षा कै. देवयानीताई परब , सदस्य कै. चंद्रशेखर परब तसेच परिसरातील ज्ञात अज्ञात व्यक्तीना भावपूर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य रवींद्र ऊर्फ बाळा जठार,माजी सभापती , विद्यमान पं.स. सदस्य दिलीप तळेकर,तळेरे गावचे उपसरपंच दिनेश मुद्रस,तळेरे व्यापारी संघटना खजिनदार राजेंद्र पिसे, तळेरे गावचे उद्योजक गोपाळ शेठ बांदिवडेकर,सामाजिक कार्यकर्ते जि.प. प्राथ. शाळा नंबर १ चे अध्यक्ष राजेश जाधव, शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर,प्रवीण वरूणकर,संतोष तळेकर, संतोष जठार, निलेश सोरप,प्रशालेचे मुख्या. एस जी. नलगे , ए.एस. मांजरेकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. बी. कानकेकर , सी.व्ही. काटे , डी.सी. तळेकर , एन.बी. तडवी , पी.एम. पाटील , पी.एन. काणेकर , व्ही. टाकळे , ए. पी. कोकरे , व्ही. केसरकर , एन. गावठे, ए.तांबे , प्रकाश घाडी ,देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर शिक्षक-,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यालयाच्या परीपाठ ग्रुप मार्फत ईशस्तवन स्वागत गीत यावेळी सादर करण्यात आले जि.प.सदस्य .रवींद्र उर्फ बाळा जठार हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . पाहुण्यांच्या स्वागतानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक.एस.जी. नलगे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या व विद्यालयाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशील अभिव्यक्तीला वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी, शिक्षक पी.एन.काणेकर, व्ही टाकळे यांच्या प्रयत्नांनी तयार झालेले नंदादीप हस्तलिखिताचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील गुणवंत तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,बक्षीस व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले . दरवर्षी विद्यालयाचे हितचिंतक , देणगीदारांच्या सहकार्याने बक्षीस वितरण समारंभ पार पडतो विद्यालयाच्या शिक्षिका डी.सी .तळेकर , सी.व्ही काटे यांनी देणगीदार आणि बक्षिसांचे वाचन केले
प्रमुख पाहुणे जठार यांनी विद्यालयामध्ये होत असलेले विविध उपक्रम , तसेच विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. यावेळी दिलीप तळेकर , प्रवीण वरूणकर , इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बळ दिले. यावेळी उद्योजक गोपाळशेठ बांदिवडेकर यांनी आपले बधू कै.श्रावणशेठ बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ दहावी.-बारावी मधून येणाऱ्या प्रथम क्रमांकास रोख २५८२ रूपये बक्षीस देण्याचे जाहिर केले.


तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एम. पाटील तर आभार व्ही.व्ही.केसरकर .यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =