You are currently viewing जमाखर्च ( लावणी )

जमाखर्च ( लावणी )

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी प्रा.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची लावणी

तो
एक पुसतो सवाल ऐसा
उत्तर दे तू राणी ग
जमा खर्चाचा डाव मांडतो
कुठला असला प्राणी ग

जिजिजी सजने माझी तू ग
मैना माझी तू ग
जिजिजी र जिजिजी र जी

ती ( उत्तर )
झाली चूकभूल देणे घेणे
हीच जगाची रीत खरी
शिवशक्तीची ताकद भारी
कोण करील र बरोबरी

जिजिजी माझा राया तू र
माझा सर्ज्या तू र
जिजिजी र जिजिजी र जी

धर्तीवर पाऊस बरसतो
एकमेकांना अस्ती ओढ
प्रपंच रंगे सारीपाटासम
जन्मजातीच फळ हे गोड

जिजिजी माझा राया तू र
माझा सर्ज्या तू र
जिजिजी र जिजिजी र जी

नारीवीना ना नर निपजती
जन्म घेणार पुरुष बीज
ढगफुटीला ढग हे कारण
घर्षणाने चमके वीज

जिजिजी माझा राया तू र
माझा सर्ज्या तू र
जिजिजी र जिजिजी र जी

दिव्याला ही वात पाहिजे
गरज वातीला पणतीची
वात जळाया तेल पाहिजे
तेल जळाया ठिणगीची

जिजिजी माझा राया तू र
माझा सर्ज्या तू र
जिजिजी र जिजिजी र जी

दिल्या घेतल्याविना जन्म ना
व्यवहार चाले जगताचा
आंबेचा मग पोत जाळुनी
सम्बळ वाजे गोंधळाचा

जिजि र जी
राया माझा तू र …… राणी माझी तू ग
सर्जा माझा तू र……. सजनी माझी तू ग
है जिजिजी र जिजिजी र जी

प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
नसलापुर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 12 =