*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला वसंत ॠतू*
आला वसंत ऋतु
फुटली पालवी फांदीला
गेला मोहवून वसंत
बहर फुलांचा फुलला
येता अलवार ऋतुराज
येई ऊधान आनंदाला
घेती मोहर वृक्षवेली
सप्तरंगी ताटवा सजला
आनंदून धरतीही
रंग वसंताचे उधळी
भासे इंद्रधनु सोबतीने
फुले रंगवी रानोमाळी
सुर मधूर कोकीळेचा
चांदणे टिपतो चकोर
फुलण्याचा हा सोहळा
प्रेयसीच्या भेटी प्रियकर
मंद झुळूक वाऱ्याची
गारवा देते तनमनाला
निसर्गरम्य चैत्र पालवी
मंत्रमुग्ध करी क्षणाक्षणाला
चैत्र वर्षाचा सोहळा
वसंतपंचमी नवरात्रीला
सण उधळीतो रंग
होळी रंगपंचमीला
शिमगा खेळता खेळता
भार जोंधळा धरते
पाहून सोहळा वसंताचा
तन मन सुखावते
कवी:- *चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर ) धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.