You are currently viewing कासारटाक्का अवघड वळणावर चिरेवाहतूक करणारा ट्रक पलटी

कासारटाक्का अवघड वळणावर चिरेवाहतूक करणारा ट्रक पलटी

चालक किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान

मालवण :

चौके येथील चिरेखाणीवर चिरे भरून बेळगांव येथे वाहतूक करणारा ट्रक क्र. KA- 22 C – 5688 हा चौकेपासून कुडाळच्या दिशेने काही अंतरावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने धामापूर कासारटाक्का परिसरातील गोडयाचीवाडी बसथांब्यानजिकच्या वळणावर रस्त्याच्या खाली जात पलटी झाला. ही घटना काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + nine =