You are currently viewing पुंडलिक दळवी यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर “ते” उपोषण स्थगित…

पुंडलिक दळवी यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर “ते” उपोषण स्थगित…

प्रशासनाने कारवाईचे दिले लेखी आश्वासन

सावंतवाडी

आरोंदा भटपावणी येथे मोठ्या प्रमाणात अवैध जांभा दगडाचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप सुर्यकांत नाईक यांनी केला ह़ोता. जांभा दगडाचे अवैध उत्खनन करणारे व तत्कालीन तलाठी सजा आंरोदा मंडळ अधिकारी आजगाव, तहसीलदार सावंतवाडी यांच्यावर शासनाचा महसुल बुडवल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करुन दंड वसुल केलेल्याचे पुरावे न दिल्यान उपविभागीय अधीकारी महसुल यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडल होत. याला सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच लक्ष वेधल होत. याबाबत आंदोलन, उपोषण करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यानं संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाईक यांनी केली होती. मात्र, उशिरापर्यंत याची दखल प्रशासनाकडून घेतली नव्हती. अखेर पुंडलिक दळवी यांच्या यशस्वी शिष्टाईनंतरच प्रशासनानं कारवाईबाबतच लेखी आश्वासन दिले. यानंतर नाईक यांनी आपलं उपोषण मागे घेतल. यावेळी राष्ट्रवादी उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, मयुरेश मुळीक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा