You are currently viewing मनसेत इनकमिंग मालिका सुरूच

मनसेत इनकमिंग मालिका सुरूच

पिंगुळी धूरीटेंबनगर,भुपकरवाङी,नेरुर व सरंबळ येथील युवकांचा मनसेत प्रवेश..

 

आज १२ जुलै २०२१ रोजी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी धूरीटेंबनगर,भुपकरवाङी,नेरुर व सरंबळ येथील युवकांनी माजी तालुकध्यक्ष बाबल गावडे, उपतालुकध्यक्ष दिपक गावडे व विभाग अध्यक्ष सुंदर गावडे यांच्या माध्यमातून मनसेचे सरचिटणीस यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर,मनसे विदयार्थी सेना अध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. वैभव धुरी, रोशन सावत, शुभम धुरी, गजानन राऊळ, तुषार धुरी, अविराज धुरी, सुरेश चव्हाण, रियाझ तहसीलदार, दिनेश चव्हाण, नारायण गावडे, अक्षय वरक आदी युवकांनी माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे हस्ते मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी धुरीटेंम्बनगर वॉर्ड शाखाध्यक्ष पदी वैभव धुरी यांची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा