लेख सादर: अहमद नबिलाल मुंडे
शहरांमधील वाढती लोकसंख्या यामुळे तेथे उपलब्ध असणाऱ्या लोकांना पुरेसा रोजगार उपलब्ध होत नाही त्यातच शहराकडे रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील लोकांचा लोंढा. यामुळे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही त्यामुळे वाढती झोपडपट्टी. वाढती गुन्हेगारी. यात होणारी वाढ व लोकांचे कष्टमय जीवन याचा विचार शासनाने करून ज्या त्या भागातील लोकाना त्याच भागात पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी व त्यांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी # महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना # या नावाने योजना राबविण्यात आली.
# हरघर गोठे. घरघर गोठे. पाणंद रस्ते. खडीकरण योजना. अशा विविध योजना राबविण्यात येतात त्या माध्यमातून सर्व लोकाना ग्रामीण विकास योजना आणि लोकांच्या हाताला रोजगार हे तत्व आहे. यासाठी शासनाने ( दि ०९ आक्टेबर २०१०)( दि ०१ आक्टेबर २०१६)( दि ०५ नोव्हेंबर २०१८)(दि ०५/०८/२०२०)( दि ०२/०९/२०२०) असे वेळोवेळी शासन जारी केले आहेत त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण मजूरांना रोजगाराची शाश्वती हमी मिळावी व त्या माध्यमातून भत्ता निर्मिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ अन्वये महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे तदनंतर # महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना # अधिनियम २००५ अंतर्गत राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना टप्याटप्याने सुरू करण्यात आली असून दि ०१ एप्रिल २००८ पासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सुचना. / निर्देश संदर्भित शासन परिपत्रक अन्वये नियोजन विभागाकडून देण्यात आलेले आहेत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मुलभूत उद्देश ग्रामीण भागातील पौढ व्यक्तिंना अकुशल कामांची मागणी केल्यानंतर कामे उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून सामाजिक पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणे हा ही या योजनेचा उद्देश आहे. सधसथिती राज्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे घेण्यात येत असून या माध्यमातून सामाजिक सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्यात येत आहे
सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली कामे ही ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व शाश्रवत विकासाच्या दृष्टीने सहहयभूत ठरली आहे. सधसथिती सुरू असलेल्या कोविड १९ महामारीचया पार्श्वभूमीवर सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवून रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर शेतकरी यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे.
पुणे जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी हरघर गोठा घरघर गोठा हा उपक्रम अगदी सापेक्ष पणे व यशस्वी रित्या राबविला आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद यांनी पाणंद रस्ते व इतर रस्ते खडीकरण करणे. दलित वस्ती सुधार. प्रास्तावित केले आहेत. सदर उपक्रम शेतकरयासाठी वैयक्तिक भत्ते निर्माण करण्याबरोबर रोजगार निर्मिती होणार आहे सदर उपक्रम अंतर्गत
(१) गाय म्हैस यांचेसाठी पक्के गोठे. गवहाण आणि शेण मलमूत्र संचय वेगळी सोय
(२) बचत गटाच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे बांधणे
(३) कुक्कुटपालन शेड ( निवारा ) बांधणे
(४) शेळी पालन निवारा
इत्यादी मालमत्तेची निर्मिती करणे सदर कामामध्ये केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे अकुशल कुशल प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी प्रतयेक लाभार्थ्यांना गोठ्याच्या कामाबरोबरच बांधावर किंवा क्षेत्रावर कमीत कमी २०/२५ फळझाडे / वृक्ष लागवड करणेसाठी मनरेगा अंतर्गत अतिरिक्त काम करावे लागते. तसेच गावांमध्ये रस्ते खडीकरण कामे हाती यावीत सदर कामाबरोबरच मृद व जलसंधारण गाळमुकत धरणांची कामे घरोघरी शोष खड्डे व घरकुल बांधणे इत्यादी कामेसुद्धा जलसंधारण. इत्यादी कामे या योजनेनुसार हाती घ्यावी
संदर्भ क्रमांक ५ अन्वये दिनांक २ सप्टेंबर २०२० या शासन परिपत्रकातील परिशिष्ट ९ मध्ये म ग्रा रो ह यो अंतर्गत घेण्यात येणार्या महत्वाचा एकूण ९० कामाची मजुरी कुशल खर्च निहाय यादी देण्यात आलेली आहे. सदर यादीतील अनुक्रमांक ७२ मध्ये रस्ता खडीकरण विशेषतः पाणंद रस्ते तयार करणे.या कामाचा समावेश करण्यात आलेला आहे उपरोक्त नमूद कामे घेतल्यास कुशल अकुशल खर्चाचे प्रमाण राखण्यास मदत होते
सदर योजनेअंतर्गत अभिनव उपक्रमांद्वारे मागेल त्याला काम मिळेल लोकांचे स्थलांतर थांबविले जाईल कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल शेतकरी स्वावलंबी होईल आणि गावे समृद्धी कडे वाटचाल करतील तसेच सदरची कामे घेतल्यास वैयक्तिक कामाबरोबर सामुहिक कामे घेवून गावांचा विकास साधला जाईल कुशल अकुशल (६०/४०) प्रमाण राखले जाईल
आजच आपल्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन आपल्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आजच आपले ग्रामसेवक यांनी भेटून आपले जाॅब कार्ड तयार करा आणि आपल्या हक्काचे काम मिळवा. महिन्यात पंधरा दिवस काम शासन किंवा ग्रामपंचायत देवू शकत नसेल तर तुम्हाला बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक आहे आपल्या ग्रामीण भागात गावात कोणी बोगस जाॅब कार्ड काढून शासनास खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करत असेल तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करा आणि आपले कर्तव्य पार पाडा
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
माहिती अधिकार दाखल केला असेल तर त्याचे सापेक्ष उत्तर देताना संबंधित आॅफिस चे लेटरहेड वर देणे बंधनकारक आहे