संदेश कवठणकर यांनी वेधले बांधकाम विभागाचे लक्ष
सावंतवाडी
कवठणी ते किनळे मुख्य रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर एक भलामोठा खडक कोसळून तो धोकादायक स्थितीत अडकून आहे .तो कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्याच्या खालील बाजूला लोकवस्ती असून त्या लोकवस्तीतील लोकांच्या जिवितेस धोका आहे. याकडे सावंतवाडी तालुका शिवसेना(ओबीसी) प्रमुख संदेश कवठणकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.