You are currently viewing संविताश्रमातील निराधारांसाठी नेमळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली मदत

संविताश्रमातील निराधारांसाठी नेमळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली मदत

संविताश्रमातील निराधारांसाठी नेमळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली मदत

सावंतवाडी
रस्त्यावरील वंचित, निराधार, वयोवृद्ध, मानसिक रूग्ण यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता येण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने पुण्यकार्य करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व संविताश्रम पणदूरचे प्रमुख संदीप परब यांच्याकडे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जमा केलेले दोनशे किलो तांदूळ, १५० नारळ व नऊ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर व लवू जाधव उपस्थित होते.

विद्यालयातील विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्षआ. भि. राऊळ यांनी विनंती केली होती. या कार्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्याना शक्य असेल त्यांनी आपल्या पालकांना सांगून एककिलो तांदूळ, एक नारळ व पन्नास रुपये आणून सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे
पालक, विद्यार्थी, संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे पदाधिकारी प्राचार्या, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी या चांगल्या कामाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे विशेष कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा