You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवाहात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवाहात

संपर्क मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री सतेज पाटील, गुलाबराव घोरपडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा दक्षता, सहनियंत्रण शासकीय कमीटीचे सदस्य विजय कदम ( कलंबिस्त) यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळासाहेब गावडे व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्यांसह प्रवेश केला.. प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये भाई सावंत (सुनील सावंत), राष्ट्रवादी कृषी सेल सावंतवाडी अध्यक्ष २)योगेश कदम राष्ट्रवादी माजी सामाजिक न्याय सावंतवाडी तालुका अध्यक्ष ३) अरुण कुडाळकर राष्ट्रवादी माजी सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग उपाध्यक्ष तसेच रामचंद्र घावरे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ते श्री.इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष दादा परब,समीर वंजारी उपाध्यक्ष सावंतवाडी, सच्चिदानंद बुगडे उपाध्यक्ष सावंतवाडी, रुपेश अहीर सरचिटणीस सावंतवाडी तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी बाळासाहेब गावडे यांच्याशी संपर्क साधून विजय कदम आणि सहकाऱ्यांना ३० सप्टेंबरला दुपारी १२ वाजता टिळक भवन मुंबई येथे आमंत्रित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 12 =