You are currently viewing मसुरे मेढा ते मागवणे रस्ता धोकादायक

मसुरे मेढा ते मागवणे रस्ता धोकादायक

मसुरे :

 

मसुरे मेढा ते मागवणे तिठा हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणीच रस्त्यावर राहिलेल्या मातीचा आणि खोदलेल्या मातीचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकी चालक रस्त्यावर घसरून पडले आहेत.

या रस्त्यावरती भूमिगत वीज वाहिनी साठी संबंधित विभागाने या रस्त्याच्या लगत खोदाई केली होती. या भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर जी माती रस्त्यावरती आलेली आहे ती माती रस्त्या लगत तशीच आहे. तसेच रस्त्यालगत खोदकाम झाल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली असताना एकमेकाला बाजू देताना सुद्धा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. भूमिगत वीजवाहिन्या बसवण्याचे काम संबंधित विभागाने केल्यानंतर पुन्हा हा रस्ता सुस्थितीत केला नसल्यामुळे वाहन चालकांना त्रासाचे ठरत आहे. संबंधित विभागाने किंवा संबंधित ठेकेदाराने सदर रस्त्यालगतची माती बाजूला न केल्यामुळे वाहने घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परब यांनी लक्ष वेधूनही अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. तरी संबंधित ठेकेदाराने अथवा संबंधित विभागाने या रस्त्यावरची माती आणि लगतचा खोदलेला रस्ता माती दूर करून संबंधित रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी शिवाजी परब यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा