You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले सांत्वन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले सांत्वन

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांचे वडील मारुती सुबराव जाधव (69) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. रुपेश जाधव यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

मारुती जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेमधून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते. वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द महत्वाची ठरली होती. कलमठ गुरववाडी निवस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर कलमठ गावडेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा रुपेश जाधव, सातीश जाधव, पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा