You are currently viewing माणगाव खोऱ्यातील ‘उमा पती सावकारी’ वर्दीची दलाली

माणगाव खोऱ्यातील ‘उमा पती सावकारी’ वर्दीची दलाली

माणगाव खोऱ्यात अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. माणगाव मधील अवैद्य व्यवसायाला स्थानिक खाकीचा आशीर्वाद असल्याचेही बोलले जात आहे. माणगाव खाकीच्या रक्षणकर्त्या महादेवाचे नाव धारण करणाऱ्या उमा पती सावकारी खाकी वर्दीवाल्याने माणगाव येथून चिठ्ठी घेऊन जाणाऱ्या मुलाला दुचाकीसहित रंगेहात पकडले होते. मटका चिठ्ठी नेणाऱ्या त्या मुलाला सोडण्यासाठी त्या उमा पती सावकारी खाकीच्या कर्मचाऱ्याने मटका चिठ्ठी नेणाऱ्या मुलाच्या मालकाकडे तब्बल १५०००/- रुपयांची मागणी केली. मालकाने १५०००/-रु. दिल्यानंतरच त्या मुलाला सोडले.
महादेवाचे नावधारी उमा पती सावकारी खाकीच्या वर्दीवाल्याने पैसे घेऊन मुलाला सोडताना “यापुढे माणगावातून मटका चिठ्ठी घ्यायची नाही”. अशीही अट घातली. त्यामुळे या उमा पती सावकारी खाकि वर्दीवाल्याचे माणगाव मध्ये धंदा मिळावा म्हणून दलाली सुरू केल्याचे दिसून येत आहे.
अवैद्य व्यवसायांना चाप लावण्यापेक्षा आपल्याला कोण दलाली देईल त्याचे भले करण्याचे धोरण माणगाव मधील महादेवाचे नामधारी उमा पती सावकारी या खाकी वर्दीधाऱ्या कर्मचाऱ्याने अवलंबीले आहे.खाकी वर्दीवालेच अवैद्य धंद्यांना साथ देतात तर आळा बसवणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी खाकीच्या धाकाने कमी होण्यापेक्षा जर खाकीच्या आशीर्वादावर वाढत जाऊ लागली तर भविष्यात पुढच्या पिढीला ते नक्कीच धोकादायक ठरणार आहे. तालुक्याच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या आणि प.प.वासुदेवानंद सरस्वतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव मधून अवैद्य धंदे करणाऱ्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या खाकीचा बंदोबस्त करावा अशी मागणी माणगाव वासीयांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 3 =