वैभववाडी
महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख मा पि बी दादा कोकरे साहेबांच्या आदेशानुसार सामाजिक ते राजकिय क्षेत्रात आपल्या कार्यातून उत्तम छाप पाडणाऱ्या धनगर समाजाच्या झुंजार रणरागिणी आदरनिय मा सौ सारिकाताई जाणू खरात यांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रांती संघटना सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा म्हणून आपली निवड करत आपल्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे तर आपण संघटना विस्तार करत समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत समाजाला न्याय देण्याचे व विकास साधण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करावेत.
सारिकाताई आपली सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी पदी नेमणूक झाल्याबद्दल महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.