You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला (17-22 सप्टेंबर 2021)

सिंधुदुर्ग जिल्हा नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला (17-22 सप्टेंबर 2021)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी 2021 महिन्यात 25 ऐतिहासिक नि:शुल्क व्याख्याने घेतल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी विविध शासकीय पदांवर अधिकारी तसेच कर्मचारी स्वरूपात घडावेत यासाठी सामाजिक उपक्रमाची सुरुवात होत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी “तिमिरातुनी तेजाकडे” उपक्रम विद्यार्थ्यांच्या पसंतीचा उपक्रम ठरला आहे. मुंबईत वास्तव्यास असणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक तसेच मुख्य अतिथी स्वरूपात संबोधित करणार आहेत.

वेळापत्रक खालील प्रमाणे:-
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021
1) मोचेमाड ग्रामपंचायत सभागृह, दुपारी 3.30 वाजता

शनिवार, 18 सप्टेंबर 2021
1) वेंगुर्ले हायस्कूल, सकाळी 10.00 वाजता

रविवार 19 सप्टेंबर 2021
1) आंबडोस ग्रामपंचायत सभागृह, मालवण- सकाळी 10.00 वाजता
2) नगरसेविका सौ. पूजा करलकर यांचे निवासस्थानी, देऊळवाडा, मालवण- सायंकाळी 04.00 वाजता

सोमवार, 20 सप्टेंबर 2021
1) श्री भगवती हायस्कूल तसेच जुनियर कॉलेज मुणगे, देवगड- सकाळी 10.00 वाजता

2) श्री. स ह केळकर महाविद्यालय, देवगड- दुपारी 02.00 वाजता

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021
1) कुंदे ग्रामपंचायत सभागृह, कुडाळ- सकाळी 9.30 वाजता
2) कै.सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे – दुपारी 12.30 वाजता

बुधवार 22 सप्टेंबर 2021
1) न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट- सकाळी 9.00 वाजता

आयोजक व समन्वयक यांच्याशी संपर्क साधून आपले स्थान व नामांकन निश्चित करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक व शासकीय नोकरीच्या मार्फत उज्वल भविष्याच्या अनुषंगाने गरजुवंत विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा