You are currently viewing बालबगीचा’त रसिक झाले मंत्रमुग्ध..!

बालबगीचा’त रसिक झाले मंत्रमुग्ध..!

*’ऋणानुबंध’ कार्यक्रमाद्वारे न्हावेलीत शब्दसखा समूहाची साहित्यिक मेजवानी*

*सावंतवाडी :*

तालुक्यातील न्हावेली येथील मुख्याध्यापक श्री. मोर्ये यांच्या निवासस्थानी शब्दसखा समूह न्हावेली – निरवडे व शब्दसखा वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त ‘ऋणानुबंध – भेट एका लेखिकेची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात सुप्रसिद्ध लेखिका वैशाली पंडित यांच्या साहित्यावर विशेष चर्चा, प्रकट मुलाखत तसेच रसिकांचे खास आकर्षण असलेला ‘बालबगीचा’ या कथाकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका वैशाली पंडित होत्या. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, शब्दसखा वाचनालयाचे अध्यक्ष श्री. मोर्ये, मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रदीप सावंत, महिला अध्यक्ष पूजा गावडे, सौ. मोर्ये, राजेंद्र गोसावी, अदिती मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत पंचारत ओवाळून मळगाव हायस्कूल, व पेंडूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांनी केले. आपल्या शब्दसखा समूहाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या व साहित्यप्रेमी नागरिकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद करत बालकांच्या मनावर संस्कार करणाऱ्या बालबगीचा या विशेष कथाकथनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

*प्रकट मुलाखतीतून उलगडला लेखिकेचा जीवन प्रवास -*
दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्य मार्गदर्शक व सुप्रसिद्ध लेखिका वैशाली पंडित यांची प्रकट मुलाखत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी घेतली. प्रा. पाटील यांनी वैशाली पंडित यांच्या बालपणापासून तर आजपर्यंतच्या संपूर्ण जीवनाचा आढावा मुलाखतीतून घेतला. यात लेखन, वाचनाची गोडी कशी लागली?, तसेच आज बालकांनी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात?, पालकांनी अवांतर वाचनासाठी मुलांना कसे प्रेरित करावे? अशा अनेक मुद्द्यांवर प्रा. पाटील यांनी वैशाली पंडित यांचे मत जाणून घेतले

*बालबगीचात रसिक झाले ओलेचिंब -*
दरम्यान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या ‘बालबगीचा’ या कथाकथनातून लेखिका वैशाली पंडित यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बालकांच्या बालमनाचा, त्यांच्या बालविश्वाचा वेध घेत लेखिका पंडित यांनी आपल्या ओघवत्या वाणीने व दर्जेदार कथाकथनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कथा ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले देखील होते.

*’मंत्रभूल’ चे प्रकाशन -*
‘ऋणानुबंध’ कार्यक्रमाचे औचित्य साधत लेखिका वैशाली पंडित यांच्या ‘मंत्रभूल’ या ललित संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. उपक्रमशील शिक्षिका देवयानी आजगावकर यांच्या हस्ते ‘मंत्रभूल’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी मंत्रभूल या पुस्तकाचा थोडक्यात आढावाही सादर केला.
दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेले सुप्रसिद्ध लेखक व कवी दीपक पटेकर यांनी आपल्या मनोगतातून वैशाली पंडित यांचे विशेष कौतुक केले व यापुढेही अशा साहित्यिक कार्यक्रमास आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माऊली विद्यामंदिर सोनुर्ली प्रशालेचे उपशिक्षक प्रदीप सावंत यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार त्रिंबक आजगावकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक श्री. गोसावी, श्री. पाटकर, साई आजगावकर तसेच शब्दसखा समूहाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.

*संवाद मीडिया*

*🏟️कृष्णामाई बोअरवेल🏟️*

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*

*📍 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*🛑 प्रोप्रा. : आनंद रामदास*

📲 *संपर्क :*

*9422381263 / 7720842463*

*Advt link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + seventeen =