You are currently viewing ओटवणे शाळा आणि हायस्कूल यांना रामचंद्र गावकर यांची देणगी व भेटवस्तू

ओटवणे शाळा आणि हायस्कूल यांना रामचंद्र गावकर यांची देणगी व भेटवस्तू

ओटवणे
ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे सरचिटणीस रामचंद्र उर्फ आबा जगन्‍नाथ गावकर यांनी ओटवणे शाळा नंबर १ आणि रवळनाथ विद्यामंदिर या हायस्कूलला प्रत्येकी दहा हजार रुपयाच्या धनादेशासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य प्रतिमा भेट म्हणून दिली.
यावेळी ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, मंडळाचे माजी खजिनदार दशरथ गावकर, ओटवणे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी गवस, ओटवणे शाळा नं १ चे मुख्याध्यापक अरुण होडावडेकर, गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर, गणपत बिरोडकर, मंगेश गावकर, महादेव खेडेकर, शरद जाधव, मधुकर खरवत आदी उपस्थित होते.
मुंबई महानगर टेलिफोन निगम कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी रामचंद्र उर्फ आबा गावकर हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांनी या दोन्ही शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपयाच्या धनादेशासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी ओटवणे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी गवस आणि ओटवणे शाळा नं १ चे मुख्याध्यापक अरुण होडावडेकर यांनी रामचंद्र गावकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा